अक्कलकोट : दैनिक सुराज्यने प्रसिद्ध केलेली बातमी ट्वीट करुन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ग्रामीण पोलिसाच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. गृहमंत्री देशमुखांकडून ट्वीट करून कौतुक केले. यामुळे निश्चितच अपघात कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतून अपघात कमी करण्यासाठी चालक-मालक यांनी घ्यावयाची काळजी बाबत वळसंग पोलीस ठाण्याच्या वतीने जयहिंद व गोकुळ साखर कारखान्याचे येथील चालक मालकाची बैठक झाली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बैठकीतील विषयावरुन विशेष टीम च्या मदतीने ट्रॅक्टर गाडी चालक व मालक यांना रिफ्लेक्टेड लावणे, दारू पिऊन गाडी चालवू नये, गाडी चालवत असताना लायसन्स बाळगणे , मोठ्याने टेप न लावणे यासारख्या बाबी संदर्भात माहिती दिली या चालक मालक जनजागृती केली.
याच उपक्रमाबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या अपघात कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी केलेल्या जनजागृतीचे कौतुक केले. यात वळसंग पोलीस ठाण्याचे कौतुक होत आहे.