रांची : देशात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. हैवानतेचा कळस गाठणारी घटना झारखंडमध्ये घडली आहे. पाच मुलं असणा-या महिलेवर 17 जणांनी मिळून अत्याचार केला आहे,झारखंडच्या दुमका जिल्ह्यात देशाला हादरुन सोडणारी घटना उघडकीस आली आहे. आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले आहेत.
येथील दुमका जिल्ह्याच्या मुफस्सिल ठाणे परिक्षेत्रात एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. आपल्या पतीसोबत जत्रेतून परतणाऱ्या महिलेवर तब्बल 17 जणांनी बलात्कार केला. संताप परगना क्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक सुदर्शन प्रसाद मंडल यांन यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली.
गावात मंगळवारी आठवडी बाजार भरतो, त्यामुळे आपल्या पती आणि पत्नी खरेदीसाठी गेले होते. त्यानंतर, खरेदी करुन रात्री 8 वाजण्याच्या सुमारात दोघेही घरी परत येत असताना, वाटेत जवळपास 17 तरुणांनी त्यांना अडवले, हे तरुण दारुच्या नशेत धुंद होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यापैकी 5 तरुणांनी मला पकडले आणि इतरांनी माझ्या पत्नीला शेजारी झाडीत नेऊन तिच्यावर दुष्कर्म केल्याचे पीडित महिलेच्या पतीने सांगितले.
पीडित महिलेला 5 मुले असून आपल्या पतीसमवेत मंगळवारी रात्री त्या आठवडी बाजारातून परत येत असताना ही घटना घडली. गावात आठवडीबाजार आणि जत्राही भरल्याने पती-पत्नी उशिरापर्यंत बाजारात खरेदी करत होते. मात्र, घरी परतताना तेथील मद्यधुंद तरुणांनी पीडितेच्या पतीला पकडून, तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. महिलेने बुधवारी सकाळी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलीस अधीक्षक अंबर लकडा यांनी डीआयजींसोबत मुफस्सिल ठाण्यात पोहोचवून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. तसेच, पीडित महिलेच्या जबाबावरुन गुन्हा नोंद करत आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेशही लकडा यांनी दिले आहेत. पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.