कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील गवशी पैकी पाटीलवाडीत शिवारात चिअर्स गर्ल आणून धिंगाणा घालण्याचा प्रकार घडला आहे. विनापरवाना क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करुन चिअर्स गर्ल शिवारात आणून तरुण गाण्यावर थिरकले. हजारो तरुण सकाळपासून कामधंदा सोडून शिवारात हजर झाले होते.
जिल्ह्यातील गवशीपैकी पाटीलवाडी येथे स्पर्धेच्या नावाखाली तरुणांनी धिंगाणा घातला. पाटीलवाडी गावातील काही तरुणांनी विनापरवाना क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करुन चक्क शिवारात ‘चिअर्स गर्ल्स’ आणून धिंगाणा घातल्याचे उघड झाले आहे.
क्रिकेट सामन्याला ‘चिअर्स गर्ल्स’ येणार म्हणून काम धंदा सोडून हजारो तरुण शिवारात ‘चिअर्स गर्ल्स’ला पाहायला आले होते. यावेळी ‘चिअर्स गर्ल्स’नी गाण्यावर ठेका धारताच उपस्थित असणाऱ्या तरुणांनी ‘चिअर्स गर्ल्स’चे हात पकडून नाचायला सुरुवात केली. असा प्रकार तीन ते चार तास सुरू होता. महत्वाचे म्हणजे एका वडिलांनी मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या क्रिकेट स्पर्धा भरवल्या होत्या.
हा सर्व प्रकार पोलिसांना कळताच शिवारात असणारे संयोजक, तरुण आणि ‘चिअर्स गर्ल्स’ यांनी धूम ठोकली. त्यांनतर राधानगरी पोलिसांनी कोरोना मार्गदर्शन सूचनांचे उल्लंघन केल्याने संयोजकांसह ‘चिअर्स गर्ल्स’ आणि त्यांच्यासोबत नृत्य करणाऱ्या तरुणांवर राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पाटीलवाडीतील शिवारात लावलेला तंबू पाहून लोकांना इथे काय सुरु आहे याचा नेमका अंदाज बांधताच आला नाही. या ठिकाणी ‘ब्राझील… ब्राझील…’ पासून ते ‘तेरी आख्या का यौ काजल’ या गाण्यांवर थिरकणाऱ्या तरुणी आणि त्यांच्या सोबत बेधुंदपणे नाचणारे तरुण पाहून लोकांना वाटेल की, इथे एखादा नृत्याचा किंवा जत्रेचा कार्यक्रम आहे. परंतु जर कोणी सांगितलं की इथे क्रिकेटच्या स्पर्धा सुरू आहेत, तर कोणाचाही त्यावर विश्वास बसणार नाही. कारण इथे क्रिकेट सोडून दुसरच काहीतरी सुरु होतं.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील गवशीपैकी पाटीलवाडीतल्या रघुनाथ पाटील यांच्या मुलाचा 8 डिसेंबरला वाढदिवस होता. मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या हौशी बापानं आपल्या शिवारात हाफ पिच क्रिकेट स्पर्धा भरवल्या होत्या. या स्पर्धेत रंग भरण्यासाठी चिअरगर्ल्सही आणल्या. आता चिअरअप करायला तरुणी आहेत म्हटल्यावर स्पर्धेला रंग तर चढणारच ना भाऊ.
पाटीलवाडीच्या माळावर चिअरगर्ल्स आल्यात म्हटल्यावर एरव्ही क्रिकेट न खेळणारी पोरंसुद्धा माळावर हजर झाली, आणि त्यांनी क्रिकेट सोडून वेगळाच खेळ सुरू केला. काहींनी तर स्टेजवर जाऊन थेट चिअरगर्ल्ससोबत नाचण्याचा आनंद लुटला. पोरांचा हा उत्साह पाहुन चिअर गर्ल्सनाही राहावलं नाही. पोरांना त्रास नको म्हणून त्याच खाली उतरल्या आणि त्यांनी लावणीच्या ठेक्यावर पोरांबरोबर ताल धरला.
दिवसभर सुरू असलेल्या या बीभत्स प्रकाराची माहिती अखेर राधानगरी पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचताच स्पर्धा भरवणारे बापलेक आणि चिअरगर्ल्सनी तिथून धूम ठोकली. पाटीलवाडीच्या माळावर नाचायला जमलेली पोरंसुद्धा पळून गेली. मात्र तोवर या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कोरोनाचे निर्बंध असताना कोणतीही परवानगी न घेता क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केल्याबद्दल दिनकर पाटील यांच्यासह चिअर गर्ल्स आणि त्यांच्यासोबत नाचणाऱ्या तरुणांवर राधानगरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.