मोहोळ : मोहोळ पोलीस ठाणे हद्दीत एक देशी बनावटीचे पिस्टल, 1 जिवंत काडतूस व एक तलवारसह एका इसमास ताब्यात घेण्यात आले असून जनार्धन शंकर लवटे असे त्याचे नाव आहे. मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्यातील एक महिला फरार आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मोहोळ पोलीस ठाणे हद्दीतील खाजाभाई शेख वस्तीवर राहणा-या एका इसमाच्या घराशेजारी असलेल्या उकिरड्यामध्ये देशी बनावटीचे पिस्टल पूरून ठेवले आहे. तसेच त्याच इसमाच्या घरात तलवार लपवून ठेवले असल्याची बातमी मिळाली.
सपोनि रविंद्र मांजरे, पोहेकाॅ/राजेश गायकवाड, नारायण रामचंद्र गोलेकर, धनाजी देविदास गाडे, मोहन शामकर्ण मनसावाले, हरीदास आगतराव पांढरे, धनराज गायकवाड, अक्षय सुहास दळवी, समीर अहमद शेख (सर्व ने. स्थानिक गुन्हे शाखा, मोहोळ) यांनी पथकास माहिती देवून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सांगितलेल्या ठिकाणी जात असताना एक इसम घाईगडबडीने निघून जावू लागला, त्याचा संशय आल्याने त्यास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयित इसमाचे घराजवळील उकीरडा उकरला असता उकीरड्यामध्ये एक स्टिलच्या डब्यामध्ये एक देशी बनावटीचा गावटी पिस्टल व एक जिवंत काडतूस मिळून आले. त्यानंतर उकीरड्यालगत असलेल्या संशयित इसमाचे घर तपासून पाहिले असता घरातील जून्या विटाखाली एका लेडिज स्कार्फमध्ये गुंडाळून ठेवलेली तलवार मिळून आली.
मिळालेले देशी बनावटीचे पिस्टल, जिवंत काडतूस, तलवार असा एकूण 51 हजार 300 रू. मुद्देमालासह जनार्धन शंकर लवटे (वय 54) यास ताब्यात घेतले. श्रीदेवी सुरेश काळे ही महिला फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या इसमास ताब्यात घेतले आहे. पोलीस काॅन्स्टेबल धनराज विलास गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहोळ पोलीस ठाणे भारतीय हत्यार कायदा प्रतिबंधक कायदयाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.