नागपूर : नागपुरात एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या आजी आणि १० वर्षाच्या भावाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने मनकापूर रेल्वे स्थानकात ट्रॅकवर उडी मारुन आत्महत्या केली. लक्ष्मीबाई धुर्वे आणि यश धुर्वे असं हत्या झालेल्यांचं नाव आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे नागपुरात खळबळ उडाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आरोपी तरुण गेल्या काही दिवसांपासून धुर्वे कुटुंबातील तरुणीच्या मागे होता. यातूनच त्याने तरुणीचं घर गाठलं आणि लक्ष्मीबाई व यश यांची धारधार शस्त्राने हत्या केली. घरात झालेल्या गोंधळानंतर शेजाऱ्यांनी धाव घेतली असता दुहेरी हत्याकांड झाल्याचं उघड झालं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र आरोपी फरार झाला होता. त्याचा शोध सुरु असतानाच मलकापूर परिसरात रेल्वेसमोर उडी मारुन त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली.
* स्वतः ही केले आत्महत्या
आरोपीने एकतर्फी प्रेमातून ६५ वर्षीय लक्ष्मीबाई धुर्वे आणि १० वर्षाच्या यश धुर्वेची धारदार शस्त्राने दिवसाढवळ्या हत्या केली. आरोपी अल्पवयीन होता. हत्या केल्यानंतर तो फरार झाला होता. काल गुरुवारी रात्री त्याने मनकापुर परिसरात रेल्वे ट्रॅक वर रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली.