मुंबई : इंटरनेटच्या महाजालातील सर्वाधिक लोकप्रिय सर्ज इंजिन असलेल्या ‘गुगल’मध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारतात जीमेल, यूट्यूब आणि गुगलशी निगडीत इतर सेवांवर परिणाम झाला आहे. आता ब-यापैकी पूर्वपदावर आलं आहे.
जवळपास ४५ मिनिटे विस्कळीत झालेली सेवा ६.५ वाजता पूर्वपदावर आली. यूट्यूबवर सुद्धा ही समस्या उद्भवली आहे. तसेच गुगल सर्च इंजिन म्हणजेच google.com मात्र व्यवस्थित सुरू असल्याचे दिसत आहे. गुगलच्या या सेवेला कशामुळे फटका बसला याचे कारण, अद्याप समोर आले नाही.
डाऊनडिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार, गुगलच्या जवळपास सर्वच सेवा ठप्प झाल्या आहेत. जीमेल, यूट्यूब, गुगल मीट, गुगल हँगआऊट आणि गुगल प्ले सेवा सुरू करण्यात नेटिझन्सना अडचण येत आहे. दरम्यान, ‘गुगल’कडून यामागचं कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
‘जीमेल’वर ‘५०० एरर’ गेल्या अर्ध्यातासापासून जीमेवर लॉगइन करण्याचा प्रयत्न करताना Temporary Error (500) असा मेसेज दाखवत आहे. यामुळे जीमेलचा वापर करणाऱ्यांसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे.
इंटरनेट जगातील सुप्रसिद्ध व्हिडिओ व्यासपीठ म्हणून ओळख असलेल्या ‘यूट्यूब’वरही तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचा मेसेज दाखवत आहे. यूट्यूबचे होमपेज सुरू होत नसल्यानं वापरकर्त्यांना व्हिडिओ पाहता येत नव्हते. यासोबतच व्हिडिओ अपलोडही पूर्णपणे ठप्प झालं होतं.
जर तुम्ही यूट्यूब उघडण्याचा प्रयत्न केला तर यूट्यूब उघडणार नाही. परंतु, जर विना लॉगिन यू्ट्यूब उघडला तर यूट्यूब चांगले काम करीत आहे. त्यामुळे असा संशय व्यक्त केला जात आहे की, गुगल लॉगिन सिस्टम काम करीत नाही. ट्विटर वर याला काही लोकांनी शेयर केले आहे.