सोलापूर : ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रा
प्रतिवर्षी लाखोंच्या उपस्थित जानेवारीत साजरा होतो. मात्र कोरोनामुळे स्थानिक प्रशासनाची यात्रेस परवानगी देत नाही. आमदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंशी संपर्क साधला. हा सोहळा यंदा श्री सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटी भाविकांची संख्या मर्यादित ठेवून, शासनाच्या निर्बंधाचे पालन करण्यास तयार असल्याचे सांगत परवानगी देण्याची विनंती केली.
ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रा दरवर्षी भरत असते. या यात्रेमध्ये सोलापूर शहरासह व आजूबाजूच्या शहर, जिल्ह्यातून बहुसंख्य भाविक यात्रेकरीता येतात. श्री सिध्देश्वरांचे योगदंडाचे प्रतिक असे विविध समाजाचे 7 नंदीध्वज आहेत. या नंदीध्वजाचे ता. 12 ते 16 जानेवारी या कालावधीमध्ये विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होत असतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या यात्रेला परवानगी मिळणे कठीण झाले आहे. शेकडो वर्षांच्या परंपरेत खंड पडू नये म्हणून आमदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्रत्येक नंदीध्वजाचे 100 नंदीध्वजधारक म्हणजेच एकूण 700 नंदीध्वजधारक व सेवेकरी तसेच शहरातील प्रतिष्ठित भाविक व यात्रेतील मानकरी असे 300 भाविक मिळून एकूण हजार लोकांनाच सहभागी होता, यावे अशाप्रकारचे नियोजन या पंचकमिटीच्यावतीने करण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे आमदार प्रणिती शिंदे व श्री सिध्देश्वर पंचकमिटी यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती.
या बैठकीत हा प्रस्ताव प्रशासनाने शासनाकडे सादर करण्याचे ठरले. तसेच त्याचा पाठपुरावा आमदार प्रणिती शिंदे यांनी करावा, असे मत जिल्हाधिकाऱ्यांनी मांडले. त्याप्रमाणे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला.
* मुख्यमंत्र्यांकडे सहीकरिता प्रस्ताव
प्रस्ताव शुक्रवारी आपत्ती व्यवस्थापन सचिव किशोर राजे निंबाळकर यांची सही होवून आपत्ती व्यवस्थापनचे संचालक अभय येवलेकर यांच्याकडे गेलेला आहे. त्यानंतर हा प्रस्ताव सोमवारी अथवा मंगळवारी मुख्यमंत्र्यांकडे सहीकरीता जाणार आहे. याबाबत आमदार प्रणिती शिंदे या सतत मुख्यमंत्री कार्यालय व श्री सिध्देश्वर यात्रा पंचकमिटी व मानकरी हिरेहब्बू यांच्या संपर्कात आहेत. या प्रस्तावाचा पाठपुरावा आमदार प्रणिती शिंदे या करत असून लवकरच त्याला मान्यता मिळेल.