पंढरपूर : मद्यधुंद ऊस वाहतूक टॅक्टरचालकाने माॅर्निंग वाॅकला गेलेल्या इसमाला जोराची धडक दिली. यामध्ये तुकाराम आत्माराम नागणे (वय ७५ रा. उपरी ) यांचा जागीच मृत्यु झाला. ही घटना आज गुरुवारी सकाळी सहा वाजता घडली.
सध्या ऊस गळीत हंगाम सुरु आहे. ऊस वाहतूक वाहने भरधाव वेगाने जात आहेत. टॅक्टर ड्रायव्हर देखील दारु पिवुन वाहन चालवित असल्याने निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हा अपघात एवढा भीषण होता की डोक्यावरुन दोन्ही टेलरची सर्व चार टायर गेलेने एकाचा जागीच मृत्यू झाला. मद्यधुंद ट्रक्टरचालक अपघाताची माहिती फोनवरुन कोणाला तरी देत होता. तो पूर्णपणे तर्र होता.