मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णी संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. सोनालीने तिच्या दिलखेचक अदांनी अनेकांची मने जिंकली आहेत. मात्र, सोनालीने आता तिच्या मराठी भाषेवरील प्रेमावरून पुन्हा एकदा सगळ्यांच मन जिंकल आहे.
सोनालीने मराठी भाषा जपण्यासाठी तिच्या डान्सिंग करिअर मधला एक मोठा निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयाने सगळ्यांना आनंद झाला असून सगळे तिची प्रशंसा करत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोनाली कुलकर्णी ‘डान्सिंग क्वीन साईज लार्ज-फुलचार्ज’ या डान्स रिअॅलिटी शोची परिक्षक आहे. लवकरच या डान्स शोचा ग्रँड फिनाले प्रदर्शित होणार आहे. तर याच डान्स शोमध्ये सोनालीने एक महत्त्वाचा निर्णन घेतला आहे. सोनाली यापुढे मराठी कार्यक्रमांमध्ये हिंदी गाण्यांवर डान्स करणार नाही. डान्सिंग क्वीनच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कार्यक्रमात सोनालीने तिच्याच गाण्यांवर वेगळ्या स्टाइलमध्ये डान्स केला आहे.
सोनाली नुकतीच लंडनहून परतली आहे. तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सोनाली लंडनला गेली होती. या सिनेमात सोनाली कुलकर्णी सोबत हेमंत ढोमे, संतोष जुवेकर आहे. दिग्दर्शन लोकेश गुप्ते हेया चित्रपटाच दिग्दर्शन करणार आहेत. अमेय खोपकर, स्वाती खोपकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.