बंगळुरू : गर्भवती महिलांना सतत सांगितलं जातं की स्वतःची काळजी घ्या, जास्त धावपळ करू नका, पण याठिकाणी ५ महिन्यांच्या गर्भवतीने धावण्याच्या शर्यतीत विश्व विक्रम नोंदविला आहे.
५ महिन्यांची गर्भवती अंकिता गौर यांनी ६२ मिनिटात १० किलोमीटर १० अंतर धावत पार केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अंकिता यांनी TCS World 10K स्पर्धेत ६२ मिनिटांत १० किलोमिटरचे अंतर कापले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गेल्या ९ वर्षांपासून अंकिता सतत धावण्याचा सराव करत आहेत. ‘एक्टिविटी’ त्यांच्यासाठी श्वासाप्रमाणे आहे असं वक्तव्य खुद्द अंकिता यांनी केलं. त्या म्हणाल्या, ‘धावण्याचा सराव मी गेल्या ९ वर्षांपासून करत आहे. त्यामुळे धावणं आता माझ्या आयुष्याचा एक भाग आहे.’ अशी प्रतिक्रिया अंकिता यांनी दिली.
अंकिता गौर इंजीनियर आहेत. २०१३ सालपासून त्या प्रत्येक वर्षी या स्पर्धेत भाग घेतात. शिवाय त्यांनी आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्येही भाग घेतला आहे. ज्यामध्ये बर्लिन, बॉस्टन आणि न्यूयॉर्क शहरांचा देखील समावेश आहे.