सोलापूर : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर नाताळपासून बंद ठेवण्यात आले आहे. सुटीचा आणि कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
२५ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत बंद ठेवले आहे. नाताळ, दत्त जयंती आणि नववर्षाच्या सलग सुट्ट्या आल्यानं या काळात स्वामी भक्तांची मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
२४ डिसेंबरच्या मध्यरात्री पासून २ जानेवारी २०२१ च्या मध्यरात्री पर्यंत श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान बंद ठेवण्यात येणाराय. या कालावधीत स्वामी भक्तांनी स्वामी दर्शनाकरता मंदिराकडे येण्याचे टाळावे, असं आवाहन मंदिर समितीनं केलं आहे.
गर्दीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरलने थैमान घातलं आहे.