सोलापूर : सायंकाळी सूर्य अस्ताला जात असताना……. लगीन घाई सुरू… 33 जोडपी कपाळाला बाशिंग आणि विशेष म्हणजे मास्क लावून मंचावर आली… या जोडप्यांना कुठलाच धर्म नव्हता, आयुष्यभर साथ देण्यासाठी… हा क्षण होता लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळ्याचा. लोकमंगल फाउंडेशनने केलेला 31 वा सर्वजातीय सामुदायिक विवाह सोहळ्यात आज रविवारी 33 जोडपे विवाह बंधनात अडकले.
माजी सहकारमंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाच्या सावटतही शासनाचे सर्व अटी आणि नियम पाळत लोकमंगल फाऊंडेशनचा विवाह सोहळा साध्या पद्धतीने आणि उत्साहात पार पाडला. या विवाह सोहळ्याचे हे 15 वे वर्ष होते. या विवाह सोहळ्यात 33 वधू-वरांनी रेशीमगाठी बांधल्या.
आलेल्या वर्हाडी मंडळींना मास्कचे वाटप करण्यात आले. बैठक व्यवस्थाही सोशल डिस्टन्सच्या पद्धतीने करण्यात आली होती. वधू- आणि वरांच्या मोजक्याच व्यक्तींना लग्नासाठी आमंत्रण देण्यात आले. लग्न सोहळ्यात उपस्थित असलेल्या वधूवरांच्या पालक तसेच नातेवाईकांना भोजन दिले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज, आ. सुभाष देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, महापौर श्रीकांचना यन्नम, उपमहापौर राजेश काळे, आमदार संजय केळकर, स्मिता देशमुख, श्री रेणुक शिवाचार्य महाराज (मंद्रुप), ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे, लक्ष्मण महाराज, लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख, युवा नेते मनीष देशमुख, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, महाराष्ट्र शिखर बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर आदींची उपस्थिती होती.
* संसारोपयोगी साहित्य देऊन कन्यादान
यंदाच्याही या सोहळ्यात आ. सुभाष देशमुख आणि त्यांच्या पत्नी स्मिती देशमुख यांनी प्रथेप्रमाणे वधू-वरांना विवाहाचे कपडे, हळदीच्या कपड्यांसह ताट-वाटी, ग्लास प्रत्येकी 5 नग, बालकृष्णाची मूर्ती, स्टीलचा हंडा, स्टीलचा डबा, तांब्या असे संसारोपयोगी साहित्य देऊन कन्यादान केले. वधूंना मणी-मंगळसूत्र व जोडवे-बिचवे दिले. यंदा कोरोनामुळे वधू-वरांची मिरवणूक काढण्यात आली नाही.