सोलापूर : येथील भीमा नदी पात्रातील २८ मोऱ्यांच्या रेल्वे पूलाजवळ शंकराचे मुख असलेली जवळपास १५० वर्षांपूर्वीची दगडी मूर्ती खोदकामात सापडली आहे. मूर्तीचे तोंड पाच फुट असून वजन एक टनाच्या आसपास आहे.
दौंड-नगर रेल्वे लोहमार्गासाठी गेल्या १५० वर्षांपूर्वी इंग्रजांनी दगडी कामातील पूल उभारला आहे. या पूलाच्या बाजूलाच दुसरा रेल्वे पूलाच्या पायाभरणीचे काम सध्या सुरु आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या ठिकाणी शनिवारी खोदकाम सुरू असतांना एका खड्यात ही मूर्ती सापडली. कामगारांनी ही मूर्ती जेसीबीच्या सहाय्याने बाजूला ठेवली आहे.
स्थानिकांच्यामते ही मूर्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून आलेली आहे. मात्र, मूर्तीचे वजन जास्त असल्याने ही मूर्ती वाहून येऊ शकत नाही. ती या ठिकाणची असल्याची माहिती काही तज्ञांनी व्यक्त केली. मूर्तीच्या मुखाचा भाग सापडला असून याच परिसरात इतर अवशेषही सापडण्याची शक्यता आहे.