इंदापूर / सोलापूर : राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे वडील विठोबा भरणे (वय 90) यांचं मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास निधन झालं आहे. पुण्यातल्या एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वत: दत्तात्रय भरणे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
विठोबा भरणे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातल्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
इंदापूर तालुक्यात तात्या नावाने ते ओळखले जायचे.
विठोबा भरणे यांच्यावर आज (बुधवारी) सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. इंदापूर तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी म्हणजेच भरणेवाडी येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील. उपमुख्यमंत्री अजित पवार हे अंत्यविधीला उपस्थित राहणार असल्याचं वृत्त आहे. पुणे जिल्ह्यातील आमदार, सोलापूर जिल्ह्यातील आमदारही उपस्थित राहणार आहेत.