मुंबई : तुमची एलआयसी पॉलिसी असेल किंवा एलआयसी पॉलिसी काढण्याच्या विचारात तुम्ही असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण सध्या एलआयसी पॉलिसीधारकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होतीय. त्यामुळे एलआयसीने ट्वीटद्वारे ग्राहकांना दक्षतेचे आवाहन केले आहे.
फसवणूक करणारे एलआयसी अधिकारी, आयआरडीएआय अधिकारी बनून ग्राहकांना कॉल करतायत. पॉलिसीची रक्कम तत्काळ मिळण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक करतायत. ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून एलआयसीने ट्वीट करून ग्राहकांना सावध केलंय.
पॉलिसीबद्दल माहिती हवी असल्यास एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर जा. कोणत्याही क्रमांकावर कॉल करून पॉलिसीबद्दल माहिती मिळवू नका. कोणताही बनावट कॉल आला तर पोलीसांकडे तक्रार दाखल करा
spuriousclines@licindia.com या लिंकवरही तक्रार दाखल करू शकता, एलआयसी पॉलिसीबाबत कोणताही तपशील सामायिक करू नका, पॉलिसी सरेंडरची माहिती कोणालाही देऊ नका, अधिक फायदे देण्याच्या आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन केले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
LIC ने ट्विटरवरून ग्राहकांना अशा फोन कॉल्सपासून सावधान राहण्याचा इशारा दिला आहे. हे भामटे पॉलिसी बाबत चुकीची माहिती देत फसवणूक करतात. शिवाय ते LIC चे अधिकारी असल्याचं भासवत असल्याने अनेकदा ग्राहक देखील त्यांच्या बोलण्याला फसतात. पॉलिसीची रक्कम त्वरित देण्याचं सांगत अनेकांती फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
* बनावट फोन कॉलपासून रहा सावधान
LIC ने जारी केलेल्या अलर्टमध्ये असं म्हटलं आहे की, कंपनी कोणत्याही ग्राहकाला पॉलिसी सरेंडर करण्याचा सल्ला देत नाही. ग्राहकांनी हे फोन कॉल्स न घेण्याचा सल्ला एलआयसीने दिली आहे. एलआयसीने ग्राहकांना सल्ला दिला की त्यांनी त्यांच्या पॉलिसीला LIC च्या अधिकृत वेबसाइटवर रजिस्टर करावे आणि तिथूनच योग्य माहिती प्राप्त करावी.