नवी दिल्ली : भारत सरकारचं परराष्ट्र मंत्रालय पासपोर्ट सेवा कार्यक्रमासाठी लोगो आणि टॅगलाइन शोधत आहे. यासाठी मंत्रालयाच्या पासपोर्ट सेवा विभागानं खास स्पर्धा आणली आहे. जाणून घेऊया या स्पर्धेविषयी सविस्तर माहिती.
या स्पर्धाद्वारे तुम्हीही पासपोर्ट सेवा कार्यक्रमासाठी लोगो डिझाइन करू करून टॅगलाइनही सुचवू शकता. तुम्हालाही जर लोगो डिझाइन करण्याची कला अवगत असेल तर तुम्ही स्वत: पासपोर्ट सेवा कार्यक्रमासाठी टॅगलाइन आणि लोगो डिझाइन करू शकता.
* 21 जानेवारी अंतिम तारीख
राष्ट्रीय सेवेसाठी तुम्ही डिझाइन केलेला लोगो आणि टॅगलाइन निवडली गेली तर हा एक मोठा सन्मान आहे. इतकंच नाही तर याचे तुम्हाला रोख बक्षीसही दिलं जाणार आहे. सरकारी वेबसाइट http://mygov.in/ नुसार सर्वोत्कृष्ट डिझाइनरला 25,000 रुपये रोख बक्षीस देण्यात येईल. यासाठी अर्ज भरण्याची शेवटती तारीख 21 जानेवारी आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* स्पर्धेतील हे आहेत नियम
सरकारच्या या स्पर्धेमध्ये कोणीही भाग घेऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परदेशात राहणारे भारतीयसुद्धा या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. या स्पर्धेसाठी जर तुम्ही लोगो तयार केला असेल तर त्यासाठी www.mygov.in या सरकारच्या वेबसाइटवर लॉगईन करा. एकावेळी एकच व्यक्त आपलं नाव नोंदवू शकतो. स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर mygov Blog या वेबसाइटवर विजेत्या नावाची घोषणा केली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, 4 आठवड्यांमध्ये यासंबंधी निकाल जाहीर केला जाईल.
* असा पाहिजे लोगो
1. तुम्ही डिझाइन केलेला लोगो ओरिजनल असला पाहिजे.
2. तुम्ही कॉपीराइट कायदा 1957 चं उल्लंघन करता कामा नये.
3. हा लोगो फक्त डिजिटल प्लॅटफॉर्मवरच डिझाइन केला गेला पाहिजे.
4. या लोगोमध्ये काहीही आक्षेपार्ह किंवा चेथावणीखोर नसावं
5. टॅगलाइनमध्ये इंग्रजी किंवा हिंदी शब्द वापरले जाऊ शकतात.
* महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
1. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लोगो एआय (AI), जेपीईजी (JPEG), पीएनजी (PNG), पीएसडी (PSD) किंवा पीडीएफ (PDF) स्वरूपात पाठवू शकता.
2. लोगो हा वेबसाइट, मोबाइल अॅप, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम अशा अनेक सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मसाठी योग्य असला पाहिजे.
3. लोगो हा जास्त रिझोल्यूशनमध्ये असणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच तो कमीतकमी 300 Dpi असावा.