सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील हजारो हिंदू-मुस्लीम भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या हैंद्रा (ता. अक्ककोट) येथील ग्रामदैवत ख्वाजा
सैफुल मुलूक बाबांचा ऊर्स महोत्सव यंदा करोना विषाणू प्रादुर्भावामुळे साध्या पद्धतीने साजरा होत आहे.
शनिवारी (ता. ९) संदल (गंध) आणि रविवारी (ता. १०) ‘चिरागा’चा मुख्य कार्यक्रम होणार आहे. सोमवारी (ता.११) प्रसाद वाटप होणार आहे. परंतु यंदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे शासकीय नियमांनुसार जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार उरूसात प्रातिनिधीक स्वरूपात धार्मिक विधी निवडक मंडळींच्या उपस्थितीत होतील.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कवालीचा व अन्य कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. भाविकांनी कोरोना प्रादुर्भाव आणि शासकीय नियम व अटींचा विचार करून उरूसात हैद्रा येथे बाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुरक्षित अंतर, तोंडाला मास्क व सैनिटायझरचा वापर अनिर्वाय आहे. दर्ग्याचे मुख्य गेट बंद ठेवून बाहेरूनच दर्शन दिले जाणार आहे. त्यामुळे भाविकांनी गर्दी करण्याचे टाळावे, असे आवाहन सैफण मलुक दर्गाहचे प्रमुख मीरासाहब मुजावर यांनी केले आहे.