मुंबई : दोघे जण मोटारसायकलवरुन रात्री त्या ठिकाणी आले. तरुणाने गाडी थांबवली. तरुणी गाडीवरुन उतरली. त्याने आपल्याकडील पिस्तुल काढून तिच्यावर गोळी झाडली. गोळीचा आवाज ऐकून लोकांचे तिकडे लक्ष गेले. पाठोपाठ त्याने स्वत:वर गोळी झाडून घेतली. या प्रकाराने आजूबाजूचे लोक स्तब्ध झाले. गोरेगावच्या बांगुरनगर परिसरात असलेल्या इन्फिनिटी मॉलच्या मागे हा प्रकार काल सोमवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडला.
मृतांमध्ये राहुल यादव ऊर्फ लग्गड (23) आणि निधी मिश्रा (22) यांचा समावेश आहे. या दोघांचे मृतदेह शताब्दी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे. लग्नाला विरोध असल्याने या दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. याप्रकरणी बांगुरनगर पोलिसांनी हत्येसह आत्महत्येचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.
प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. यातील तरुणीचा नुकताच साखरपुडा झाला असल्याचे सांगण्यात येते. हे दोघेही कांदिवली भागात राहणारे होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तरुणाने या तरुणीला मोटारसायकलवरुन कांदिवलीहून इन्फिनिटी मॉलच्या मागे आणून तिच्यावर गोळीबार केला. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळाहून पोलिसांनी एक रिव्हॉल्व्हर, राऊंड आणि रिकाम्या पुंगळ्या जप्त केल्या आहेत. ही घटना सोमवारी रात्री नऊ वाजता मालाड येथील इनॉरबीट मॉल, एका मैदानात घडली.
राहुल हा कांदिवली तर निधी ही मालाड परिसरात राहते. या दोघांचे प्रेमसंबंध होते, मात्र आंतरजातीय असल्याने त्यांच्या प्रेमाला तसेच लग्नाला घरच्या लोकांचा विरोध होता, त्यातच निधीचा अलीकडेच साखरपुडा झाला होता, त्यामुळे या दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेतला होता, सोमवारी रात्री ते दोघेही मालाड येथील एका मैदानात आले होते, राहुलने एक रिव्हॉल्व्हर आणले होते, रात्री नऊ वाजता त्याने याच रिव्हॉल्व्हरमधून निधीवर गोळी झाडली आणि नंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.