नवी दिल्ली : केंद्र सरकारने ड्रायव्हिंग करणाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. गाडीमध्ये तुम्ही एकटे असाल तर मास्क लावण्याची गरज नाही, असे केंद्र सरकारने दिल्ली हायकोर्टात स्पष्ट केले आहे.
सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्यास दंड ठोठावला जातो. ड्रायव्हिंग करतानाही मास्क अनिवार्य आहे. मात्र, गाडीत एकटे असताना मास्क लावणे बंधनकारक आहे, अशा कोणत्याही सूचना आम्ही जारी केलेल्या नसल्याचे सरकारने म्हटले आहे.
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं मास्क वापरणं बंधनकारक केले आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्यास दंड ठोठावला जातो. ड्रायव्हिंग करतानाही मास्क अनिवार्य आहे. पण एकट्यानं गाडीतून प्रवास करत असाल तर मास्क घालायलाच हवा का? याबाबत केंद्र सरकारनं दिल्ली हायकोर्टात स्पष्टीकरण दिलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गाडीत एकटं असताना मास्क लावणं बंधनकारक आहे, अशा कोणत्याही सूचना आम्ही जारी केलेल्या नाहीत. असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. कारमध्ये एकट्यानं प्रवास करत असाल तर मास्क लावणं अनिवार्य आहे.
दिल्लीत एकट्यानं ड्रायव्हिंग करताना मास्क न लावल्यास 2000 रुपये दंड आकारला जातो. बंद गाडीत ड्राइव्ह करतानाही असे चलान कापण्यात आले त्यामुळे दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. यावर कोर्टात सुनावणी झाली.
कोर्टानं दिल्ली पोलीस, दिल्ली सरकार आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला नोटीस जारी करत स्पष्टीकरण मागितलं. याबाबत केंद्र सरकारनं कोर्टात आपलं उत्तर दिलं आहे.