नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या एका नकाशात जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन भूभाग भारतापासून वेगळे असल्याचे दाखवले आहे. डब्ल्यूएचओच्या अधिकृत संकेतस्थळावर हा रंगीत नकाशा उपलब्ध आहे. या नकाशात भारतीय भूभाग हा गडद निळ्या रंगात दर्शवण्यात आलेला आहे. तर जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग राखाडी रंगात दाखवण्यात आला आहे. या नकाशावर ब्रिटनधील प्रवासी भारतीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या नकाशाबाबत माफी मागितली गेली पाहिजे, अशी मागणी आता होत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO)जारी करण्यात आलेल्या एका नकाशात जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन भूभाग भारतापासून वेगळे दर्शवण्यात आले आहे. हा रंगीत नकाशा जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जागतिक आरोग्य संघटनेकडून जारी करण्यात आलेल्या या नकाशात भारतीय भूभाग हा गडद निळ्या रंगात दर्शवण्यात आलेला आहे. तर जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग राखाडी रंगात दाखवण्यात आला आहे. WHO कडून जारी करण्यात आलेल्या नकाशावर ब्रिटनधील प्रवासी भारतीयांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
‘Covid-19 Scenario Dashboard’ यामध्ये हा नकाशा देण्यात आला असून, जागतिक स्तरावर कोणत्या देशात कोरोनाचे किती रुग्ण आढळून आले आहेत आणि कोरोनामुळे कोणत्या देशात किती मृत्यू झाले आहेत, याची माहिती या नकाशाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. दरम्यान, ‘यूनायटेड नेशन’च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन संघटनेकडून केले जाते आणि त्याप्रमाणेच नकाशा पाहिला, समजला आणि दाखवला जातो, असे स्पष्टीकरण WHO कडून देण्यात आले आहे.
लंडनधील प्रवासी भारतीय असलेल्या पंकज यांच्या निदर्शनास ही बाब सर्वप्रथम आली. एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर हा नकाशा शेअर करण्यात आला होता. हा नकाशा सर्वप्रथम पाहिला तेव्हा जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भूभाग भारतापासून वेगळा दाखवल्यामुळे ही हैराण झालो. यामागे चीनचा हात असू शकेल. कारण चीनकडून WHO ला मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केली जाते, असा दावा पंकज यांच्याकडून करण्यात आला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.
‘प्रवासी समूह’च्या प्रमुख नंदिनी सिंह यांनीही यासंदर्भात तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. कोरोना संकट काळात केलेल्या कामाबाबात भारताचे आभार मानले गेले पाहिजेत. याउलट, भारताला नुकसान पोहोचवण्याचे काम डब्ल्यूएचओकडून केले जात आहे. या नकाशाबाबत माफी मागितली गेली पाहिजे, अशी मागणी नंदिनी सिंह यांनी केली.