नाशिक : नाशिक जिल्ह्यात 13 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. चाकूचा धाक दाखवत मुलीवर अत्याचार करण्यात आला. धक्कादायक म्हणजे आरोपींमध्ये 1 मुलगीही आहे. पीडितेच्या परिचयातील एक मुलगी तिला तिच्या घरी घेऊन गेली. तिथे गेल्यावर आरोपींनी तिच्यावर वारंवार अत्याचार केला. नाशिकरोड पोलिसात 7 जणांविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीमध्ये 2 अल्पवयीन मुलं असल्याचं समजतंय.
महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत. देशात सध्या उत्तर प्रदेशातील बदायूं बलात्कार प्रकरण चर्चेत आहे. नाशिक जिल्ह्यात 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. घडलेल्या घटनेमुळे नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पीडित मुलीच्या आईने नाशिकरोड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित मुलगी तिच्या घरात होती. त्यावेळी तिच्या परिचयातील एक मुलगी तिला तिच्या घरी घेऊन गेली. तिथे गेल्यावर आरोपींनी तिच्यावर वारंवार अत्याचार केला. त्यानंतर भयभीत झालेल्या मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर आईने मुलीसोबत झालेल्या अत्याचाराविरोधात नाशिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. धक्कादायक बाब म्हणजे, सात आरोपींमध्ये एका मुलीचाही समावेश आहेत. तर उरलेल्या सहा आरोपींपैकी दोन आरोपी अल्पवयीन आहेत.
तक्रारीनंतर नाशिकरोड पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तसेच याप्रकरणी सखोल तपास सुरु आहे. चाकूचा धाक दाखवून अत्याचार केल्याची तक्रारीत नोंद करण्यात आली आहे.