नवी दिल्ली : हैदराबादस्थित कोस्टल प्रॉजेक्ट्स लि. कंपनीने भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील बँकांची 4 हजार 736 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कंपनीने 2013 ते 2018 या कालावधीत खोटी लेखापुस्तिका आणि आर्थिक विवरणपत्रे तयार केल्याचा आरोप बँकेने केला आहे. दरम्यान, सीबीआयने कंपनीच्या संचालकांच्या निवासस्थान, कार्यालयांवर छापे टाकले आहेत.
भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) नेतृत्वाखालील बँकांची 4736 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने हैदराबादस्थित कोस्टल प्रॉजेक्ट्स लि. ही कंपनी आणि तिच्या संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत, असे काल शनिवारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या कंपनीने खोटी लेखापुस्तिका आणि आर्थिक विवरणपत्रे तयार केली असल्याचा आरोप एसबीआयने नोंदविलेल्या तक्रारीत केला आहे, असे सीबीआयचे प्रवक्ते आर. सी. जोशी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे प्रवर्तकांच्या सहभागाबद्दलही कंपनीने चुकीची माहिती दिली आहे, असेही प्रवक्त्याने सांगितले.
सीबीआयने कंपनीच्या संचालकांच्या हैदराबाद आणि विजयवाडा येथील निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले असून आक्षेपार्ह दस्तऐवज आणि अन्य साहित्य जप्त केले आहे, असेही ते म्हणाले.