नागपूर : शारीरिक संबंध ठेवताना कुछ नया करण्याच्या नादात गळफास लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना 7 जानेवारीला नागपुरात घडली होता. आता या प्रकरणी पोलिसांनी त्या तरुणाच्या प्रेयसीला अटक केली आहे.
नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरातील लॉजमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना 7 जानेवारीला घडली होती. या प्रकरणी 22 वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली आहे. मृत मुलाच्या वडिलाने नागपूर पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान पॉर्न बघून त्याप्रमाणेच शरीरसंबंध ठेवण्याच्या प्रयत्नात दोरीने गळफास लागला आणि मुलाचा मृत्यू झाला, आमच्यात पाच वर्षापासून प्रेमसंबंध होते, अशी माहिती तरुणीने दिली होती.
नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात महाराजा लॉजमध्ये 7 जानेवारीला संध्याकाळी ही विचित्र घटना घडली. 27 वर्षीय मृत तरुण इंजिनिअर होता. मृत तरुण आणि त्याची 22 वर्षीय मैत्रीण या दोघांमध्ये पाच वर्षांपासून प्रेम संबंध आहे. काल दोघांनीही बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला. दोघेही खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव (रंगारी) परिसरात असलेल्या महाराजा लॉजमध्ये गेले आणि एक खोली बुक केली. तिथे गेल्यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले. यावेळी कुछ नया करण्याच्या नादात तरुणाने काही तरी वेगळा करण्याचा प्रस्ताव दिला, तरुणीने तो मान्य केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दोरीचा उपयोग करत तरुणीने खुर्चीवर तरुणाचे हात आणि पाय दोरीने बांधले पुढे तीच दोरी त्याच्या गळ्याच्या भोवती सुद्धा गुंडाळली. थोड्या वेळाने तरुणी स्वच्छतागृहात गेली. मात्र, खुर्चीवर दोरीने बांधलेला तरुण तसाच होता. काही वेळाने तो खुर्चीसह खाली कोसळला, दुर्दैवाने त्याच्या गळ्याभोवती असलेला दोर आवळला गेला आणि त्याला गळफास लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तरुणी स्वच्छतागृहातून बाहेर येईपर्यंत तरुणाचा मृत्यू झाला होता.
तरुणीने लगेचच या घटनेची माहिती लॉज व्यवस्थापकांना दिली. त्यांनी पोलिसांना या संदर्भात माहिती दिल्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्राथमिकदृष्ट्या त्या ठिकाणी तपासणी केली असता बांधलेल्या दोरीने गळा आवळला गेल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.
आपल्या मुलाची हत्या असल्याचं सांगत आता तरुणाच्या वडिलांनी नागपूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन मृत तरुणाच्या प्रेयसीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून यात आणखी काय पुढे येते हे पाहावं लागेल.