मुंबई : सुगड मांडण्याआधी त्याला हळद-कुंकू ओलं करून त्याच्या उभ्या रेषा लावून सजवावे. हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, हळद, कुंकू, गव्हाच्या लोंब्या हे साहित्य सुगडात घालावे. काही ठिकाणी विशेषत: कोकणात काळ्या सुगडावर लाल सुगड पालथे ठेवण्याची पद्धत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अन्यत्र काळे मोठे सुगड खाली त्यावर लाल सुगड ठेवून दोन्हीत वाण भरतात. सुगडावर अक्षता, फुलं, हळद कुंकू वाहून नमस्कार करावा व हलव्याचा नैवेद्य दाखवावा.