मुंबई : राज्य सरकारची सरकारी कर्मचाऱ्यांना मकर संक्रांतीला गोड बातमी दिली आहे. सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नव्या वर्षाच्या सुरुवातीची भेट सरकारी कर्मचाऱ्यांना आनंद देणारी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेताना महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने आता महागाई भत्ता 9 टक्यांवरून 12 टक्क्यांवर गेला आहे. दरम्यान, 1 जानेवारी 2019 ते 30 जून 2019 या कालावधीसाठी वाढीव 3 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जानेवारी 2019 ते जून 2019 या सहा महिन्यांची वाढीव महागाई भत्त्याची रक्कम जानेवारी 2021 च्या पगारात रोखीने मिळणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार घसघसीत मिळणार आहे. तीन टक्के महागाई भत्ता वाढीच्या थकबाकीची रक्कम जानेवारी 2021 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे.