मुंबई : बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री प्राची देसाईला पाहून चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे. प्राचीला विमानतळावर बघितले गेले त्यावेळी प्राची व्हीलचेयरवर दिसली. प्राचीच्या पायाला दुखापत झाल्यामुळे तिला चालता येत नाही. मात्र, प्राचीला या अवस्थेत पाहून चाहत्यांना धक्काच बसला आहे.
या दरम्यान, प्राचीने ब्लॅक टी-शर्ट आणि ब्लॅक जीन्स घातली होती. प्राचीचे हे व्हीलचेयरवरील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत आणि चाहते तिला काळजी घेण्याचा सल्ला देखील देत आहेत आणि प्रार्थना करत आहेत.
प्राचीने आपल्या करिअरची सुरुवात एकता कपूरच्या शो कसममधून केली होती. यानंतर प्राचीने रॉक ऑन या चित्रपटात काम केले. अखेर ती 2019 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट हाऊसफुल 4 मध्ये दिसली होती. प्राची 2019 नंतर कोणत्याही चित्रपटात किंवा शोमध्ये दिसली नाही. प्राचीने आपल्या आगामी चित्रपटांमध्ये घोषणा अद्याप केलेली नाही.