मुंबई : शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंवर सतत टीकेचा भडीमार करणारे नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. शिवसेनेच्या वर्धापन दिना दिवशी मुख्यमंत्रीचा मास्क उतरवून आपल्या ठाकरे शैलीत सर्वांचाच उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला होता. त्यानंतर आता प्रथमच ठाकरे आणि राणे एका मंचावर येत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विमानतळाचे स्वप्न अखेर येत्या २३ जानेवारीला पूर्ण होणार आहे. अनेक वर्षापासून रखडलेला चिपी विमानतळ उदघाटन सोहळा येत्या २३ जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यासोबतच भाजप नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा २६ जानेवारी रोजी होईल, असे आधी सांगण्यात आले होते. मात्र, त्यात बदल करून हा सोहळा शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी २३ जानेवारी रोजी ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे अनेक वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
खासदार नारायण राणे यांनी शिवसेना पक्षाला सोडचिट्टी देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यात नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. तसेच ठकरे यांच्यावर टीका करताना राणे कुटुंबाचा तोलही अनेकदा गेला होता. त्यात आता एकाच व्यासपीठावर हे दोन्ही नेते दिसून येणार आहेत. त्यामुळे त्या दिवशी काय घडणार, काय ऐकावयास मिळणार याविषयी तर्कवितर्क लावला जात आहे.