सोलापूर : आज राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागला. मात्र यंदा कोरोनामुळ काही ठिकाणी सेलिब्रेशनवर बंधन टाकण्यात आली आहेत. यात सोलापूरच्या बार्शी येथील मतमोजणी केंद्रावर अतिउत्साही कार्यकर्त्यांना पोलिसांनी चोप दिला. बार्शीत जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचं पाहायला मिळाले.
वारंवार ध्वनिक्षेपकावरून पोलिसांनी सूचना देऊनही मतमोजणी केंद्राच्या आवारात विजयानंतर गुलाल उधळल्याच्या कारणावरून पोलिसांनी कार्यकर्त्यांना चांगलाच चोप दिला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांकडून जल्लोष केला जात आहे. मात्र वातावरणात तणाव निर्माण होऊ नये म्हणून अनेक जिल्ह्यांमध्ये निवडणूक निकालानंतर मिरवणूक काढण्यास प्रशासनाकडून मनाई करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातही गुलाल उधळणे, विनापरवाना बॅनर लावणे आणि विजयी मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली होती. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबतचे आदेश दिले. मात्र असं असतानाही बार्शी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयानंतर काही कार्यकर्ते गुलाल उधळत जल्लोष करत होते. या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागला आहे.