पुणे : पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटला आग लागल्यानंतर सर्वात आधी कोरोना लशीविषयी अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले. मात्र चिंता करण्याची गरज नाही. कारण सिरमने कोरोनावर बनवलेल्या सर्व कोविशिल्ड लशी दुसऱ्या प्लांटमध्ये सुरक्षित आहेत. कोरोना लशीचे उत्पादनही दुसऱ्या ठिकाणी सुरू आहे. तर हडपसरजवळच्या गोपाळ पट्टीतील प्लांटला जिथे आग लागली, ती सिरमची वेगळी इमारत आहे.
देशभरात कोरोना लस पुरवणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली आहे. BCG लस बनवण्याच्या इमारतीला आग लागलेली आहे. ज्या ठिकाणी बी सी जी लस बनवली जाते त्या ठिकाणी आग लागली आहे. सीरम इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नवीन प्लांट आहे. अग्निशामक दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आग लवकरात लवकर विझवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि विभागीय आयुक्त सौरव राव यांच्याकडून दूरध्वनीवरुन परिस्थितीची माहिती घेतली. संस्थेतली अडकलेल्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय मदत करण्याचे आदेश देत अजित पवारांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सांगितलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
इमारतीत 4 जण अडकले होते. त्यापैकी तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. एका व्यक्तीचा शोध सुरू आहे. आगीचा कोणताही परिणाम कोव्हीशील्ड वॅक्सीन प्रोडक्शनवर होणार नाही, अशी माहिती सीरम इन्स्टीट्यूटने दिली. कोविशिल्ड’ लसीचे उत्पादन सुरू असलेली इमारत सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कारण आग ही BCG लस बनवण्याच्या इमारतीला लागली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून आग विझवण्याचे काम सुरु आहे.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्या ठिकाणी आग लागली तिथं करोना व्हॅक्सीन बनत नाही तर बीसीजीसाठीची लस बनते. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आत्तापर्यंत तरी कुठल्याही जिवीतहानीबद्दलची माहिती नाही. मी तातडीने घटनास्थळी रवाना होत आहे, अशी माहिती खासदार गिरीश बापट यांनी दिली.
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही व्हॅक्सीन बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. कोरोनावरील लसीची निर्मिती इथं मे महिन्यापासून सुरू आहे. सीरम इन्स्टिट्यूटकडून पोलिओ, डायरीया, हिपॅटायटस, स्वाईन फ्लू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती केली जाते. आज जगभरात वेगवेगळ्या आजारांवरती ज्या लसींचा उपयोग केला जातो त्यापैकी 65 टक्के लसी या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होतात.
* घातपाताच संशय
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीला भीषण आग लागली. सीरम इन्स्टिट्यूटच्या मांजरी इथल्या नव्या इमारतीला ही आग लागली. सुदैवाने कोरोनावरील कोव्हिशिल्ड लस बनवण्याचं काम दुसऱ्या इमारतीत सुरु आहे. त्यामुळे कोरोना लस सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. दुपारी दीड ते दोनच्या सुमारास ही आग लागली. या आगीत कोणताही जीवितहानी झालेली नाही. मात्र भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनी व्यक्त केलेली शंका ही अत्यंत धक्कादायक आहे. आमदार मुक्ता टिळक यांनी या आगीमागे घातपाताची शंका आहे, का असा प्रश्न विचारुन, तशी शंका व्यक्त केली.
घातपाताचा प्रकार वाटतोय, प्रथमदर्शनी असं वाटतंय. कारण ज्याठिकाणी आग लागलीय, त्या परिसरात कोरोना लस बनवण्याचं काम सुरु आहे. हा घातपाताचा प्रकार वाटतोय ही माझी शंका आहे”, असं भाजप आमदारा मुक्ता टिळक म्हणाल्या.