नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनामुळे राजधानी दिल्ली हादरुन गेली आहे. भाजपचे गुरदासपूरमधील खासदार आणि अभिनेते सनी देओल यांनीही दिल्लीतील हिंसाचाराबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. अभिनेता दीप सिंह सिद्धूचा चेहरापण कालपासून चर्चेत आहे. तो भाजपाचा समर्थक असून त्यानेच आंदोलनात हिंसा केल्याचा दावा केला जात आहे. हे उघड करण्यासाठी सन्नी देओल आणि पीएमबरोबर फोटोही कालपासून शेअर होत आहेत. त्यामुळे सन्नीला वैतागून हा खुलासा करावा लागतोय. आपला कोणताही संबंध नसल्याचं सनीने स्पष्ट केलं आहे.
दिल्लीतील लाल किल्ल्यावर प्रजासत्ताक दिनी फडकवलेल्या किसान युनियनच्या झेंड्याबद्दल आणि उफाळलेल्या हिंसेबद्दल दीप सिंह सिद्धूला जबाबदार ठरवले जात आहे. दीपचं नावं समोर आल्यानंतर नेटिझन्सनी सनी देओल यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
सनी देओल यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर 6 डिंसेंबर 2020 ची एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यावर त्यांनी स्पष्ट रुपात लिहिलंय की दीप सिद्धूशी त्यांचा कोणताही संबंध नाही. सनी देओल यांनी आपल्या सोशल मीडियावर लिहिलंय “आज लाल किल्ल्यावर जे झालं, ते पाहून मन खूप दुःखी झालं आहे. मी आधीही 6 डिसेंबरला फेसबुकवरुन स्पष्ट केलं आहे की माझा किंवा माझ्या परिवाराचा दीप सिद्धूसोबत कोणताही संबंध नाही. जय हिंद.” असंही सनी देओल यांनी लिहिलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“दीप सिद्धू, जो निवडणुकांच्या वेळी माझ्या सोबत होता, दीर्घ काळापासून माझ्यासोबत नाही. तो जो काही करत आहे, ते स्वतः करत आहे, स्वतःच्या इच्छेनुसार करत आहे. त्याच्या कुठल्याही कृत्याशी माझा संबंध नाही. मी माझा पक्ष आणि शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. मी नेहमीच शेतकऱ्यांच्या सोबत राहीन. आमच्या सरकारने नेहमीच शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार केला आहे. मला खात्री आहे की सरकार त्यांच्यासोबत बोलून तोडगा काढेल” असंही सनी देओल यांनी लिहिलं आहे.
“आज लाल क़िले पर जो हुआ उसे देख कर मन बहुत दुखी हुआ है, मैं पहले भी 6dec को फेसबुक के माध्यम से यह साफ कर चुका हूँ कि मेरा या मेरे परिवार का दीप सिद्धू के साथ कोई संबंध नही है।!
जय हिन्द।
* म्हणे आंदोलनात कोणी पडू नये
“माझी संपूर्ण जगाला विनंती आहे, की हा शेतकरी आणि आमच्या सरकारमधील प्रश्न आहे. यामध्ये कोणीही पडू नका. दोघंही आपापसात बातचित करुन यावर तोडगा काढतील. मला माहित आहे की अनेक लोकांना यांचा फायदा उचलायचा आहे. आणि त्यांना यात आडकाठी करायची आहे. ते शेतकऱ्यांचा अजिबात विचार करत नाहीत. त्यांचा काहीतरी वैयक्तिक स्वार्थ यामागे दडला आहे” असंही सनी देओल यांनी लिहिलं आहे.
* दीप सिद्धू हा पंजाबी अभिनेता
शेतकरी आंदोलनात एक व्यक्ती चर्चेत आला आहे. तो व्यक्ती आहे पंजाबी अभिनेता दीप सिद्धू. जाणून घेऊ हा दीप सिद्धू नेमका कोण आहे आणि तो चर्चेत का आला आहे.
दीप सिद्धू हा पंजाबी अभिनेता आणि मॉडेल आहे. तो किंगफिशर मॉडेल हंट चा विजेता राहिलेला आहे. दीप सिद्धू हा वकील सुद्धा राहिलेला आहे. बालाजी टेलिफिल्म्सच्या लीगल हेडची जबाबदारी पार पाडताना तो अभिनयाकडे वळला. त्याने पंजाबी सिनेमात काम केले आहे. तो पंजाबी इंडस्ट्रीमधील एक मोठा चेहरा आहे.
शेतकरी आंदोलनात सुरुवातीपासून सक्रिय असलेल्या सिद्धूवर बीजेपीचा व्यक्ती असल्याची टीका होत आहे. त्याचे पंतप्रधान मोदी यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सिद्धू ने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे खासदार सनी देओल यांचा प्रचार केला होता. सिधुला शेतकरी आंदोलनात सामील झाल्यानंतर NIA कडून समन देखील मिळाले होते.