कॅमरून : मध्य आफ्रिकी देश कॅमरूनमध्ये बुधवारी झालेल्या भीषण रस्ता अपघातात 53 लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कॅमरूनच्या पश्चिम भागातील एका खेड्यात बस आणि तेलाचा टँकर यांच्यात धडक झाली. या अपघातात 21 जण गंभीर जखमी झाले आहेत.
बेकायदेशीरपणे तेल घेऊन जाणाऱ्या ट्रकने धडक देताच बसला आग लागली. जखमींना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. बसमध्ये 70 पेक्षा जास्त प्रवासी होते. मध्य आफ्रिकी देश कॅमरूनमध्ये भीषण रस्ता अपघात झाला आहे. काल बुधवारी एका बस आणि टँकरची धडक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत किमान 53 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच या अपघातामध्ये 21 लोक जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या पश्चिम भागात एका खेड्यात हा अपघात झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या अपघातामध्ये 20 पेक्षा जास्त लोक आगीत होरपळले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ही घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला? याचं कारण शोधण्याचं काम पोलीस करत असून घटनास्थळी अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेकायदेशीरपणे इंधन वाहून नेणाऱ्या ट्रकने बसला धडक दिल्याने हा अपघात झाला. जोरात धडक झाल्यामुळे लगेच आग लागली. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक ठार झाले. मिळालेल्या माहितीनुसार, जखमींना जवळच्या स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे, 70 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला बेकायदेशीरपणे तेल घेऊन जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. ज्यामध्ये बसमध्ये बसलेल्या बर्याच लोकांचा मृत्यू झाला तर बरेच जण गंभीर जखमी झाले.