पुणे : प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचे आज रविवारी सकाळी वयाच्या 75व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. सांगलीमधील दुधगाव या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनची मान्यता मिळवलेले कवी अशी त्यांची ओळख होती. मराठी, हिंदी, उर्दू या भाषेतील अनेक मासिकांत त्यांच्या गझला आणि कविता प्रकाशित झाल्या आहेत.
इलाही जमादार यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात गझलेला पोसलं. आपल्या समृद्ध लेखनीतून त्यांनी एकापेक्षा एक अशा गझल दिल्या. मराठ, हिंदी आणि अनेक उर्दू मासिकांमधून त्यांच्या कविता, गझल प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या जाण्याने गझल पोरकी झाल्याची भावना गझलप्रमींमध्ये आहे. इलाही जमादार यांनी या क्षेत्रांत कमी काळात मोठे नाव कमावल्याने सुरेश भटांनंतर मराठी गझल क्षेत्राला समृद्ध करणारा गझलकार म्हणून इलाही यांचे नाव घेतले जाऊ लागले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
इलाही जमादार यांचा जन्म 1 मार्च 1946 रोजी त्यांचा सांगलीतील दुधगावमध्ये झाला. 1964 पासून त्यांनी कविता लेखनास सुरुवात केली. लिखानात जादू आणि कवितेविषयीच्या जाणीवेमुळे त्यांनी अत्यंत कमी काळात कविता आणि गझलक्षेत्रामध्ये आपले नाव कमावले. पुढे त्यांच्या गझलांना एवढी प्रसिद्धी मिळाली की, सुरेश भट यांच्यानंतर गझलेला समृद्ध करणारी व्यक्ती म्हणून त्यांचे नाव घेतले जाऊ लागले.
गझलकार इलाही जमादार यांची शब्दांवर चांगली पकड होती. शब्दांची जाण असल्यामुळे त्यांच्या कविता थेट मनाला भिडत. मराठी, हिंदी, उर्दू भाषेची दैनिकं, मासिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. 2020 च्या जुलै महिन्यात ते तोल जाऊन पडल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
* इलाही जमादार यांचे साहित्य
मराठी – एक जखम सुगंधी, शब्दसुरांची भावयात्रा, स्वप्न तारकांचे, भावनांची वादळे (गझला व निवेदन)
हिंदी अल्बम – हिंदी पॉप गीते
संगीतिका –
हिंदी – सप्तस्वर, माया और साया, नीर क्षीर विवेक.
मराठी – स्वप्न मिनीचे
नृत्यनाट्ये :
हिंदी – नीरक्षीरविवेक
जखमा अशा सुगंधी , भावनांची वादळे , दोहे इलाहीचे, मुक्तक आदी इलाही जमादार यांचे काव्य आणि गझल संग्रहही प्रसिद्ध आहेत.