मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कन्येचा आज सांताक्रुझ येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये साखरपुडा पार पडला. राऊत यांची कन्या पूर्वशी आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांचा साखरपुडा आज पार पडला. यावेळी मोजकेच नातेवाईक उपस्थित होते. अत्यंत साध्या पण प्रसन्न वातावरणात हा सोहळा पार पडला.
सनई चौघड्यांचे सूर आणि मंत्रोच्चार अशा भारलेल्या वातावरणात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या कन्येचा साखरपुडा आज पार पडला. सांताक्रुझ येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये राऊत यांची कन्या पूर्वशी आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांचा साखरपुडा पार पडला. यावेळी मोजकेच नातेवाईक उपस्थित होते.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या कन्येचा साखरपुडा थाटामाटात पार पडला. राऊत यांची मुलगी पूर्वेशीचा ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे सुपूत्र मल्हार नार्वेकर यांच्याशी साखरपुडा संपन्न झाला आहे. संजय राऊत यांची कन्या पूर्वेशी राऊत आणि मल्हार नार्वेकर यांचा मुंबईतील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये छोटेखानी समारंभात साखरपुडा पार पडला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी संपूर्ण राऊत कुटुंब हजर होतं. तसंच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. संजय राऊत यांचे व्याही हे ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आहे. राजेश नार्वेकर हे अभ्यासू आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी याआधी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काम केले आहे. तसंच 2018 मध्ये मुख्यमंत्र्यांचे सहसचिव म्हणून सुद्धा काम पाहिले होते.
आज दुपारी बरोबर सव्वा बाराच्या मुहूर्तावर ग्रँड हयातमध्ये पूर्वशी आणि मल्हार यांचा साखरपुडा पार पडला. यावेळी राऊत आणि नार्वेकर कुटुंबीयांखेरीज काही जवळचे नातेवाईक उपस्थित होते. अत्यंत साध्या पण प्रसन्न वातावरणात हा सोहळा पार पडला. साखरपुडा होताच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचे भाव उमटले होते.
मल्हार नार्वेकर हे उच्च शिक्षित आहेत. तसेच त्यांचा स्वतंत्र व्यवसाय असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यांचे वडील राजेश नार्वेकर हे ठाण्याचे जिल्हाधिकारी आहेत. नार्वेकर हे कर्तव्यदक्ष आणि मितभाषी अधिकारी म्हणून सर्वपरिचित आहेत. तर, पूर्वशी राऊत या उच्चशिक्षित असून ‘ठाकरे’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. सायन इथे त्यांचं ऑफिस आहे.
* पवार, ठाकरे, फडणवीस एकत्र
पूर्वशी आणि मल्हार यांचा आज दुपारी साखरपुडा पार पडला. संध्याकाळी अनेक मान्यवर या दोघांनाही आशीर्वाद देण्यासाठी येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना साखरपुड्याचे आमंत्रण देण्यात आलं आहे. या सोहळ्यानिमित्ताने हे सर्व दिग्गज नेते एकत्र येणार आहेत. त्यामुळे या दिग्गजांच्या उपस्थितीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सोहळ्याला रश्मी ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. या शिवाय मराठी आणि सिनेसृष्टीतील काही कलाकारही उपस्थित राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.