मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत २०२१-२२ साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले. केंद्रीय अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या असून विरोधकांनी मात्र या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे. तर, भाजप नेत्यांनी मात्र या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे. त्यातल्यात त्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अतिच केले.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील या अर्थसंकल्पावर भाष्य केलं आहे. देशाच्या मागील १०० वर्षांत असं बजेट सादर झालेलं नाही, असं म्हणत त्यांनी निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
‘भारताच्या मागील १०० वर्षांत असं अर्थसंकल्प सादर झालेलं नाही. हे अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार. वाढीव कर लावल्याशिवाय देशाच्या प्रगतीस चालना कशी दिली जाऊ शकते हे आता जगातील सर्व देश बघतील आणि शिकतील ,’ असं कौतुक देखील अमृतीत फडणवीस यांनी केलं आहे.
दरम्यान, नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद करण्यात आल्याची घोषणा सीतारामन यांनी केल्यानंतर फडणवीस ट्विटरच्या माध्यमातून नाशिककर व नागपूरकरांचं अभिनंदन केलं आहे.