नवी दिल्ली : साऊथ चित्रपट विश्वातील कॉमेडी कलाकार ब्रम्हानंद यांनी नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. ब्रम्हानंद हे असे कलाकार आहेत, ज्यांनी एक हजारहून अधिक चित्रपटात काम केले आहे. त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदलं गेलं आहे. तसेच देशातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी ते एक आहेत. दरम्यान, चित्रपटात येण्यापूर्वी ते तेलगू विषयाचे प्राध्यापक होते.
भारतीय चित्रपट सृष्टीत प्रत्येक कलाकाराची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. काही कलाकार वर्षातून 1 तर काही कलाकार वर्षात पाच चित्रपटही करतात. सर्वात जास्त चित्रपट करणाऱ्याच्या यादीमध्ये आपल्याला लगेच अक्षय कुमार आठवतो. अक्षय वर्षाला 3 ते 5 चित्रपट करतो. पण साऊथ चित्रपट विश्वात ब्रह्मानंदम नावाचा असा कॉमेडी कलाकार आहे, जो सुपरस्टारपेक्षा कमी नाही. त्यांचा चाहता वर्ग संपूर्ण देशात विखुरलेला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
साऊथ चित्रपट विश्वातील बहुतांशी चित्रपट ब्रह्मानंदम शिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत. साऊथच्या बहुतांशी चित्रपटात ब्रह्मानंदची छोटीशी का होईना पण त्याची भूमिका असतेच असते. आपल्या या छोट्याशा भूमिकेनेही ब्रह्मानंदम दर्शकांचं लक्ष वेधून घेतो. ब्रह्मानंदम पृथ्वीतलावरील असा एकमेव अभिनेता आहे, ज्याने 1 हजाराहून अधिक चित्रपटात काम केलं आहे. याचीच दखल म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ब्रह्मानंदमचं नोंदलं गेलं आहे. अशा या महान कलाकाराचा आज वाढदिवस आहे.
ब्रह्मानंदम यांचा जन्म जानेवारी 1956 मध्ये सत्तेनापल्ले येथे झाला होता. आज त्यांचा 65 वा वाढदिवस आहे. ब्रह्मानंदम चित्रपटात येण्यापूर्वी तेलगू विषयाचे प्राध्यापक होते. त्यांनी 1987 साली ‘अहा मेरी शादी’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. आज 34 वर्षांनंतर ब्रह्मानंदम साऊथ चित्रपट सृष्टीतील कॉमेडीचा किंग म्हणून नावारुपाला आहे.
* शिल्पकलेची आवड, पद्मश्रीने सन्मानित
अभिनयासोबतच ब्रह्मानंदमला शिल्पकलेची आवड आहे. ब्रह्मानंदमच्या चेहऱ्यावरील केवळ हावभावही लोकांना हसायला प्रवृत्त करतात. ब्रह्मानंदमने आपल्या डायलॉग डिलीव्हरीच्या टायमिंगने चाहत्यांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ब्रह्मानंदम हा देशातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यांच्याबाबत आणखी एक बाब प्रसिद्ध आहे, ती म्हणजे ते 7 वाजल्यानंतर घरातून बाहेर पडत नाहीत. असं म्हटलं जात की, 997 चित्रपट झाल्यानंतर त्यांनी चित्रपटाची गणना करणं सोडलं होतं. ब्रह्मानंद यांनी चित्रपट सृष्टीसाठी दिलेलं योगदान लक्षात घेवून भारत सरकारने त्यांना 2009 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं आहे.