कोल्हापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल सादर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या पदरात फार काही पडलं नसलं, तरी पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईला यायचा प्रवास हा जलद होणार आहे. काल सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात मेट्रोसाठी साडे पाच हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
देशातील बहुतांश रेल्वे मार्गांवरील रेल्वे या आगीमी काळात वीजेवर चालणार असून, यामुळे कोल्हापूर ते मुंबई हा प्रवास कमी वेळेत करता येणार आहे. याचा फायदा मुंबई-पुणे-मिरज-कोल्हापूर यादरम्यान येणाऱ्या स्थानकांनादेखील होणार आहे.
कोल्हापूर रेल्वे कोकण रेल्वेला जोडण्यासाठी निधीचे काय? याविषयी तुर्त प्रश्न चिन्ह कायम आहे. मात्र, त्यासाठीही निधीची उपलब्धता होईल अशी अपेक्षा आहे, असे मत रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रतिनिधीने व्यक्त केलंय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याबाबत रेल्वे प्रवासी निखिल शहा म्हणाले,कोल्हापूर – मिरज रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झालंय. चाचणी यशस्वी झालीय. तसेच मिरजेवरून पुणे पर्यंतचे विद्युत मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. अशा वेळी देशभरातील रेल्वे वीजेवर धावण्यासाठी पुरेसा निधीही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अन्य मार्गावरही विद्युतमार्ग होतील, त्यामुळे येणार्या काळात कोल्हापूर-मिरज गाडी विजेवर धावू शकतील, असे घडल्यास कोल्हापूरातून मुंबईला अवघ्या 6 तासात पोहचता येणे शक्य होणार आहे.
पुणे-मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचं काम पूर्ण होऊन,त्याची चाचणीदेखील घेण्यात आली आहे. देशातील रेल्वेंच्या विद्युतीकरणासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आल्यामुळे देशभरातील बहुतांश रेल्वेचं विद्युतीकरण होण्याची शक्यता असल्यामुळे कोल्हापूर – मिरज रेल्वे वीजेवर धावतील. असे झाल्यास, कोल्हापूर ते मुंबई प्रवास अवघ्या सहा तासांचा होणार आहे. कोकण रल्वेशी कोल्हापूरला जोडण्याविषयी अद्याप तरी काही घोषणा करण्यात आलेली नाही.