मुंबई : अखेर महाराष्ट्रात कॉलेज 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज मुंबईतील पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. सुरुवातीला कॉलेज 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेण्याचे आवाहन सरकारने विद्यापीठांना केले आहे. विद्यार्थ्यांना मास्क बंधनकारक आहे.
राज्यातील महाविद्यालयं सुरु करण्यास परवानगी राज्य सरकाने परवानगी दिली आहे.त्यानुसार येत्या 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालयं 50 टक्के विद्यार्थी उपस्थितीच्या अटीवर सुरु होणार आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना कोविड संकट पाहता तूर्तास 75 टक्के सक्तीच्या उपस्थितीची अट बंधनकारक असणार नाही. राज्यातील शाळा सुरू झाल्या मात्र, महाविद्यालये सुरू झाली नव्हती. त्यामुळे महाविद्यालयं त्वरित सुरु करण्याची मागणी अनेकजण करत होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यातच राज्यातील कोरोनाचे संकट कमी झाले आहे. त्यामुळे महाविद्यालये सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. अखेर 50 टक्के विद्यार्थी उपस्थितीच्या अटीवर महाविदयालये सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
* CBSE च्या बारावीची परीक्षा प्रथमच होणार दोन सत्रात
नुकतेच CBSE ने आगामी बोर्ड परीक्षांसाठी इयत्ता दहावी, बारावीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार, दहावीची परीक्षा एकाच सत्रात होणार आहे. तर बारावीची परीक्षा पहिल्यांदाच दोन सत्रात होणार आहे. पहिले सत्र सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 पर्यंत तर दुसरे सत्र दुपारी 2.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत असणार आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेच्या आकलनासाठी 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे.