मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती दररोज एकाहून जास्त ट्वीट करतेच. हेच वादग्रस्त, नियमांचं उल्लंघन करणारे टीवटीवाट करणे महागात पडलंय. अभिनेत्री कंगना राणावत उठसूट सर्वांवर भडकत असताना दिसत आहे. त्यामुळे ट्वीटरने मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले.
दरम्यान, कंगनाची टीम जे ट्विटर अकाउंट सांभाळायची तेच अकाउंट कंगनाने वापरायला घेतलं आहे. ऑगस्टपासून स्वतः कंगना यात ट्वीट करत असते. सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर ती या अकाउंटवरूनच विरोधकांवर सातत्याने टीका करत होती. याच काळात तिला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली होती. अलीकडे कंगनाने शेतकरी आंदोलनाविरोधात ट्वीट करायला सुरुवात केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कंगनाने शेतकरी आंदोलनाचं समर्थन करणाऱ्या पॉपस्टार रिहानासाठी वादग्रस्त ट्वीट केलं होतं. मात्र याचाच फटका आता तिच्या ट्विटर अकाउंटला बसला आहे. ट्विटरने आता कंगनाचे एक- दोन नाही तर अनेक ट्वीट डिलीट केले आहेत. याबद्दल स्पष्टीकरण देताना ट्विटरने कंगनाच्या ट्वीटमुळे अनेक नियमांचं उल्लंघन झाल्याचं सांगितलं.
* सर्व वादग्रस्त ट्वीट डीलीट
कंगनाच्या ट्वीटवर ट्विटरच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन करणार्या कंगनाच्या सर्व ट्वीटवर कारवाई करण्यात आली आहे. कंगनाचे कोणतेच वादग्रस्त ट्वीट तिच्या हॅण्डलवर दिसणार नाहीत. यातील एक ट्वीट रोहित शर्मा आणि इतर क्रिकेटपटूं संदर्भातले होते. या ट्वीटमध्ये कंगनाचे त्यांची तुलना ‘धोबी के कुत्ते’ अशी केली होती.
* रिहानालाही म्हटले मूर्ख
रिहानाच्या या ट्वीटवर अभिनेत्री कंगना रणौतनं तिला उत्तर दिलं आहे. कंगनानं रिहानाच्या ट्ववीटवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ‘यावर कोणीही बोलत नाही कारण ते शेतकरी नाहीत तर दहशतवादी आहेत. जे देशाला तोडण्याचं काम करत आहेत. ज्यानंतर चीन भारताचं तुकडे करण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून नंतर तो कमकूवत झालेल्या प्रदेशांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करेल आणि मग अमेरिकेप्रमाणे चायनिज कॉलनी उभी करू शकेल. तुम्ही मूर्ख आहात पण आम्ही आमचा देश असा विकत नाही आहोत. जसं तुम्ही मूर्ख लोकांनी केलं आहे.
* कंगनाचा आता तापसीवर निशाणा
अभिनेत्री कंगना राणावत उठसूट सर्वांवर भडकत असताना दिसत आहे. शेतकरी आंदोलनावरून सध्या ट्विट वॉर सुरू आहे. अभिनेत्री तापसी पन्नूने कोणाचीही बाजू न घेता ‘तुम्ही दुसऱ्यांसाठी ‘प्रोपागंडा टीचर’ बनून काही उपयोग नाही’, असे म्हटले. यावरून कंगनाने आता तापसीवर निशाणा साधला. ‘बी ग्रेड लोकांचे बी ग्रेड विचार… फुक्कट खाणारे बनू नका… या देशावर बोझ’, असे कंगनाने म्हटले आहे.