मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. गृहमंत्र्यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
अनिल देशमुख गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी राज्यातील विविध भागांच्या दौऱ्यावर होते. त्यांचा नुकताच आता विदर्भ दौरा झाला. या दौऱ्यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोनाची चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गेल्या नऊ महिन्यात पोलीस खात्यातील भरपूर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. या कठीण काळात राज्याचे गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख स्वत: विविध ठिकाणी जाऊन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना धीर देत होते. कोरोना काळात त्यांनी पोलिसांची जबाबादारी खांद्यावर घेतली. आवश्यक तिथे पोलिसांची बाजू घेतली. त्याचबरोबर त्यांनी पोलिसांच्या कामांचं देखील तोंडभरुन कौतुकही केलं. पोलिसांप्रती असणारा अभिमान त्यांच्या बोलण्यातून कायम जाणवतो.
* कोरोनावर मात करून पुन्हा येईन
‘आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल’, असं अनिल देशमुख म्हणाले.
आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल.