मुंबई : फिल्मी दुनियेतून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिणेतील अभिनेता आणि मॉडेल श्रीवास्तव चंद्रशेखरने आत्महत्या केली आहे. चेन्नईतील राहत्या घरात चंद्रशेखरचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने वल्लमई थारायोसह अनेक वेब सीरिजमध्ये महत्वपूर्ण भूमिका केल्या. तो नैराश्यात होता. दरम्यान काही दिवसांपूर्वीच सुशील गौडा, जयश्री रमैया, वीजे चित्रा यासारख्या दक्षिण भारतीय कलाकारांनी आत्महत्या केली.
दाक्षिणात्य अभिनेता चंद्रशेखर श्रीवास्तवचे निधन झाले. चंद्रशेखर एक उत्तम अभिनेता होता आणि मॉडेलही होता. खास गोष्ट म्हणजे चंद्रशेखरने वेब सीरीज वल्लमई थारायोमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. चंद्रशेखर श्रीवास्तवच्या निधनामुळे चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे. असे सांगितले जात आहे की, चंद्रशेखर श्रीवास्तवचे बुधवारी कुठलेच शूट नव्हते, आणि तो घरीच होता. चंद्रशेखर श्रीवास्तवचा मृतदेह त्याच्याच घरात लटकलेला आढळला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
चंद्रशेखर श्रीवास्तवने नेमक्या कुठल्या कारणास्तव आत्महत्या केली हे पूर्णपणे स्पष्ट झाले नाही. मात्र, असे म्हटले जाते की, चंद्रशेखर गेल्या काही महिन्यांपासून मानसिक त्रासातून जात होता. चंद्रशेखर या अनपेक्षित मृत्यूने नेटिझन्स हादरले आहेत. चंद्रशेखरच्या चाहत्यांना विश्वासच बसत नाही की, या जगात तो नाही.
यापूर्वी दक्षिणात्य अभिनेता सुशील गौडाने आत्महत्या केली होती. या अभिनेत्याने 2020 मध्ये जगाला निरोप दिला होता. होम टाऊन मंड्यामध्ये या अभिनेत्याने आत्महत्या केली होती. सुशीलच्या मृत्यूने त्याचे हितचिंतक, मित्र आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीला धक्का बसला. अवघ्या 30 वर्षांचा सुशील गौडा रोमँटिक टीव्ही शो अंतापुरामध्ये अभिनय करण्यासाठी ओळखला जात होता.