मुंबई : भारताबाहेरच्या लोकांनी भारताच्या मुद्द्यांवर हस्तक्षेप करु नये, अशा आशयाचे ट्विट सचिन तेंडुलकर याने केले होते. त्यानंतर शरद पवार यांनी टोला लगावला होता. त्यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला. कृषी मंत्री असताना आपले शेती क्षेत्र सोडून आयपीएल स्पर्धा भरवलेल्या चालतात, पण सचिनने राष्ट्रहिताच्या बाजूने आपले मत मांडले ते ‘राष्ट्रवादी’ काँग्रेसच्या अध्यक्षांना चालत नाही, असे भातखळकर म्हणाले.
भारताच्या अंतर्गत बाबतीत बाहेरील शक्ती केवळ प्रेक्षक असू शकतात, ते याचा भाग होऊ शकत नाहीत. भारतातील नागरिक भारताला चांगले ओळखतात, यामुळे त्यांनीच भारतासंदर्भात निर्णय घ्यायला हवेत. देश एकसंध रहायला हवा,”असं ट्विट सचिननं केलं होतं. त्यांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सचिन तेंडुलकरला एक सल्ला दिला होता. यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“कृषी मंत्री असताना आपलं शेती क्षेत्र सोडून क्रिकेटच्या आयपीएल स्पर्धा भरवलेल्या चालतात. पण सचिनने राष्ट्रहिताच्या बाजूने आपलं मत मांडलं ते ‘राष्ट्रवादी’ काँग्रेसच्या अध्यक्षांना चालत नाही,” असं म्हणत भातखळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पवार यांच्यावर निशाणा साधला.
सचिन तेंडुलकरने केलेल्या शेतकऱ्याबाबतच्या विधानानंतर अनेक लोकं आक्रमक झाली होती. “आपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना सचिन तेंडुलकरने काळजी घ्यावी, असा माझा सल्ला राहिल,” असं शरद पवारांनी सांगितलं. तसेच इतके दिवस शेतकरी जर रस्त्यावर बसतायत तर त्याचा विचार करायला पाहीजे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत आता आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत. हे खरं तर चांगलं नाही, असंही ते म्हणाले होते.