नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविंद्रनाथ टागोरांचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला होता. त्यावर अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिले. रविंद्रनाथ टागोरांच्या खुर्चीवर मी नाही तर नेहरु बसले होते, असे अमित शाह म्हणाले. मी त्या खिडकीपाशी बसलो होतो ज्या ठिकाणी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, प्रतिभा पाटील आणि बांग्लादेशच्या पंतप्रधान बसले होते, असेही शाह म्हणाले.
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर रविंद्रनाथ टागोरांचा अपमान केल्याचा आरोप केला होता. आता त्या आरोपाला अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिलंय. रविंद्रनाथ टागोरांच्या खुर्चीवर मी नाही तर नेहरु बसले होते असे अमित शाह म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बंगालमधील शांतीनिकेतनच्या दौऱ्यावरुन अधीर रंजन दास यांनी त्यांच्यावर आरोप केला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गृहमंत्री अमित शाह इतिहासाचा दाखला देत म्हणाले की, “मी कधीही रविंद्रनाथ टागोरांच्या खुर्चीवर बसलो नव्हतो. मी त्या खिडकीपाशी बसलो होतो, ज्या ठिकाणी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, प्रतिभा पाटील आणि बांग्लादेशच्या पंतप्रधान बसले होते.”
मी टागोरांचा अपमान केला ही गोष्ट चुकीची आहे असं सांगत चुकीचा आरोप करणे ही काँग्रेसची मानसिकता असल्याचा आरोप अमित शहांनी केला. या दरम्यान त्यांनी शातीनिकेतनच्या कुलपतींच्या स्पष्टीकरणाचा दाखला दिला. तसेच बंगालच्या दौऱ्यातील फोटोच्या हवाल्याने आपल्यावरील आरोप चुकीचे आहेत असं सांगितलं.
त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि राजीव गांधी यांचेही काही फोटो संसदेत दाखवले. अमित शाह यांनी असा दावा केला की हे दोन नेते रविंद्रनाथ टागोरांच्या सोफ्यावर बसले होते. तसेच सोशल मीडियाच्या हवाल्याने काँग्रेसकडून काहीही चुकीच्या गोष्टी संसदेत बोलल्या जातात असा आरोपही अधीर रंजन यांच्यावर केला.