नागपूर : नागपूर कारागृहात शिक्षा भोगत असलेला कुख्यात डॉन अरुण गवळी याच्यासह पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. यात कुख्यात शेखूचाही समावेश आहे.
एकाच वेळी पाच बंदीवानांना कोरोना झाल्याने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी अरुण गवळी याची प्रकृती खालावली होती. चाचणी केल्यावर लागण झाल्याचे समोर आले. या पाचही जणांचे कारागृहात वेगवेगळ्या बॅरेकमध्ये विलगीकरण करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सर्वांना कारागृहातीलच विलगणीकरण कक्षात ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. दोन दिवसांपूर्वी अरुण गवळी याची प्रकृती खालावली होती. त्यामुळे गवळी याच्यासह अन्य कैद्यांची करोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल आज आला. यात गवळीसह पाच जणांना कोरोना संसर्गाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या पाचही जणांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांना तीन वेळा काढा, गरम पाणी व औषधे दिले जात आहे. कोरोनाची लागण झालेल्या कैद्यांमध्ये कुख्यात शेखूचाही समावेश आहे. अन्य तिघे कच्चे कैदी आहेत, अशी माहिती कारागृह अधीक्षकांनी दिली.