पुणे : कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी ईडीला नोटीस पाठवली आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या संबंधीत एका प्रकरणातील कागदपत्रांच्या झेरॉक्सचे पैसे दिले नाहीत, म्हणून सरोदे यांनी ईडीला नोटीस पाठवली आहे. ईडीनं सरोदे यांचे कागदपत्रांचे 1 हजार 440 रुपये देऊ, असं सांगितलं होतं. मात्र, ते दिलेले नाहीत. आता ईडी त्यांच्या नोटिसीला काय उत्तर देते हे पाहणं महत्त्वाचं आहे.
अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने (ED) दिग्गजांना नोटीस पाठवल्याच्या घटना सध्या समोर येत आहेत. मात्र अशातच वकील असीम सरोदे यांनी चक्क ईडीलाच नोटीस पाठवली आहे. झेरॉक्सचे पैसे न भागवल्याने असीम सरोदेंनी ही नोटीस पाठवली आहे. महत्त्वाचं म्हणजे ईडीने असीम सरोदेंचे 1 हजार 440 रुपये थकवल्याने असीम सरोदेंनी थेट नोटीस पाठवली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कथित भूखंड घोटाळ्याची चौकशी ईडी करत आहे. ईडीने त्यासाठी तक्रारदार अंजली दमानिया यांचे वकील असीम सरोदे यांची मदत घेतली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही हजार कागदपत्रांची माहिती असीम सरोदे यांच्या कार्यालयातून घेतली होती.
मात्र माहिती देताना कागदपत्रांच्या झेरॉक्सचा खर्च हा ईडीला द्यावा लागेल, अशी अट असीम सरोदेंनी घातली होती. ते ईडीने मान्यही केलं होतं. पण ईडीने अजूनही त्यांचे 1 हजार 440 रुपये दिलेले नाहीत. त्यामुळे असीम सरोदेंनीचक्क ईडीलाच नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये त्यांनी थकीत पैशांची मागणी केली आहे.
ईडीच्या अधिकृत मेलवरती बिलाची प्रत देऊनही ईडीनं त्यांचे पैसे जमा केलेले नाहीत. त्यामुळे सरोदेंनी ईडीलाचा नोटीस पाठवल्यावरती आता ईडी त्यांच्या नोटीसला काय उत्तर देते? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
आर्थिक अफरातफरी, पैशांच्या गैरव्यवहारांची चौकशी ईडी करतं. सध्या अनेक राजकारण्यांना ईडीने नोटीस धाडली आहे. मात्र आता ईडीलाच नोटीस मिळाल्याने, कार्यालयाकडून काय उत्तर येतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.