सातारा : फलटण ते पुणे रेल्वे सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी फलटणकरांमधून गेले बरेच दिवस सुरु होती. त्यास यश आले आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी पुढील महिन्यात फलटण ते पुणे रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी आपण स्वतः उपस्थित राहू, अशी ग्वाही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिल्याचे सांगितले जात आहे.
फलटण ते लोणंद रेल्वेसेवा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खासदार म्हणून निवडून गेल्यावर तातडीने सुरु केली. त्या नंतर फलटण ते पुणे रेल्वे सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी फलटणमधील नागरिकांकडून होत होती. फलटण ते पुणे रेल्वे सेवेचा फायदा सर्वसामान्य नागरिकांसह, शेतकरी व व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात होणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण ते पुणे रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न केले असून त्यांच्या प्रयत्नांना आता यश आलेले आहे.
सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सोलापूरचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामी, आमदार रणजितसिंह मोहिते – पाटील, आमदार प्रशांत परिचारक, आमदार जयकुमार गोरे, आमदार राहुल कुल, सोलापूर भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी भेट घेतली. फलटण ते पुणे रेल्वेच्या शुभारंभासाठी आपण स्वतः उपस्थित रहावे, अशी आग्रही मागणी केली. त्या वेळी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आपण स्वतः उपस्थित राहू, असे आश्वासन दिल्याचे सांगण्यात येत आहे.