नवी दिल्ली : सर्वसामान्यांना झटका देणारी बातमी आहे. देशभरात कोरोनाशी लढणाऱ्या फ्रंटलाईनवरील योद्ध्यांना लस दिली जात आहे. लवकरच सर्वसामान्यांना लस दिली जाणार आहे. मात्र ही लस मोफत मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण, मार्चपासून तिसऱ्या गटातील नागरिक म्हणजे 50 पेक्षा जास्त वयाच्या सर्वसामान्य व्यक्तींना लस दिली जाणार आहे. पण या व्यक्तींना मोफत लस देण्याबाबत कोणताही विचार झालेला नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले.
देशात सध्या कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. सरकारनं प्राधान्यक्रमानुसार लसीकरण मोहीम राबवत आहे. सर्वात आधी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती ज्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे, त्यांना लस दिली जाणार आहे. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना सध्या लस दिली जात आहे. आता तिसऱ्या गटातील नागरिकांचं लसीकरण मार्चपासून सुरू होणार आहे. या गटाला कोरोना लशीची प्रतीक्षा असताना आता मोदी सरकारनं मोठा झटका दिला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नीती आयोगाचे सदस्य आणि राष्ट्रीय कोव्हिड टास्क फोर्सचे अध्यक्ष व्ही. के. पॉल यांनी आयएएनएस वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं, या वयाच्या व्यक्तींना मोफत लसीकरण करण्याबाबत अद्याप कोणता निर्णय झाला नाही. याबाबत राज्यांसह बैठक घेतली जाईल आणि चर्चा केली जाईल. आम्ही आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना मोफत लस देत आहोत. 50 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना मोफत लसीकरण आणि खर्चाबाबत राज्य आणि केंद्र सरकार बैठक घेईल.
सध्या देशभरात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना मोफत कोरोना लस दिली जाते आहे. मार्चपासून तिसऱ्या गटातील नागरिक म्हणजे 50 पेक्षा जास्त वयाच्या सर्वसामान्य व्यक्तींचं लसीकरण केलं जाणार आहे. पण या व्यक्तींना मोफत कोरोना लस देण्याबाबत कोणताही विचार झालेला नाही, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.