औरंगाबाद : 1500 स्क्वेअर फुटांपर्यंत घर बांधण्यासाठी यापुढे परवानगीची गरज लागणार नाही. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. ते आज औरंगाबादेत बोलत होते. 31 डिसेंबर 2020 पर्यंतची बांधकामे नियमित होतील, तर 3 हजार स्क्वेअर फूट घरे बांधणाऱ्यांसाठी 10 दिवसात परवानगी मिळेल, असेही ते म्हणाले. राज्याच्या नगरविकास विभागाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
आता 1500 स्क्वेअर फुटांपर्यंत घर बांधण्यासाठी परवानगीची गरज नाही, अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी केलीय. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज औरंगाबाद महापालिकेच्या अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नगरविकास विभागाच्या वतीने मोठा निर्णय घेतला गेला असून, 31 डिसेंबर 2020 पर्यंतची बांधकामे नियमित होतील, त्याचबरोबर 1500 स्क्वेअर फूट घर बांधायचे असेल तर महापालिकेची परवानगी घेण्याची गरज नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राज्यातील 55 हजार कुटुंबांना गुंठेवारीचा फायदा होणार असून, 3 हजार स्क्वेअर फूट घरं बांधणाऱ्यांसाठी 10 दिवसांत परवानगी देणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं. थकीत वीजबिल असलेल्या शेतकऱ्यांची वीज तोडणी केली जात असल्याने याबाबत मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांशी बोलणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय.