मुंबई : अभिनेता रणबीर कपूर अनेक कारणांनी चर्चेत असतो. त्यातच आता मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे सध्या तो चर्चेत आहे. पोलिसांनी रणबीर कपूरची कोट्यावधी रूपयांची कार जप्त केली आहे. रणबीर एका हॉटेलात गेला होता. तेव्हा त्याने आपली रेंज रोव्हर कार नो पार्किंग झोनमध्ये उभी केली. मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्याच्या लक्षात ही गोष्ट आली अन् त्याने मुंबई पोलिसांच्या मदतीनं ही गाडी ताब्यात घेतली.
अभिनेता रणबीर कपूर गेल्या काही काळात आपल्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळं अधिक चर्चेत राहू लागला आहे. अभिनेत्री आलिया भट्टसोबतचे त्याचे फोटो सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. मात्र यावेळी तो कुठल्याही अभिनेत्रीमुळं नव्हे तर चक्क मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळं चर्चेत आहे. पोलिसांनी त्याची कोट्यवधींची कार ताब्यात केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आलेल्या वृत्तानुसार रणबीर आपल्या मित्रमंडळींना भेटण्यासाठी एका हॉटेलात गेला होता. त्यावेळी त्याने आपली कोट्यवधी किंमतीची रेंज रोव्हर कार नो पार्किंग झोनमध्ये उभी केली. अर्थात त्याची ही चूक तेथे उपस्थित असलेल्या मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्याच्या लक्षात आली. अन् त्याने मुंबई पोलिसांच्या मदतीनं ही गाडी ताब्यात घेतली. पोलिसांनी गाडीच्या चाकांवर लॉक लावलं. लक्षवेधी बाब म्हणजे पोलिसांची ही कारवाई पाहण्यासाठी रणबीरच्या चाहत्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. दरम्यान रणवीरच्या गाडीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
9 फेब्रुवारी रोजी रणबीर कपूरचे काका राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 58 वर्षांचे होते. रणबीर आणि त्याच्या काकांमध्ये खूप चांगले संबंध होते. काकांच्या निधनामुळं त्याला जबरदस्त मानसिक धक्का बसला होता. या दु:खातून बाहेर येण्यासाठी त्यानं आपल्या मित्रमंडळींची भेट घेतली. अन् त्याच दरम्यान नो पार्किंगमुळं त्याची गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली. रणबीर लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी करत असून यामध्ये रणबीरची गर्लफ्रेंड अभिनेत्री आलिया भट्ट, अभिनेते अमिताभ बच्चन, नागार्जुन, डिंपल कपाडिया आणि मौनी रॉय हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.