मुंबई : नवी मुंबईत एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. भूषण पवार असे त्यांचे नाव आहे. ते एपीएमसी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. पवार यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. ते काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. त्यांनी स्वतःच्या तणावाबाबत कोणाकडे वाच्यता केली नव्हती. मात्र ते आर्थिक परिस्थिती व कौटुंबिक कारणाने त्रस्त होते असेही काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
नवी मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. सहाय्कक पोलीस निरीक्षकाने पोलीस स्थानकामध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. सदर घटना आज सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान घडलेली आहे. त्यांनी आत्महत्या का केली, यामागील नेमक्या कारणांचा शोध पोलीस घेत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सहायक पोलीस निरीक्षक पवार हे एपीएमसी पोलीस ठाण्यात ड्युटीवर होते. सकाळी ते पोलीस ठाण्यात आले. त्यानंतर ते केबिनमध्ये बसले होते. काही वेळाने गोळीबाराचा आवाज झाला. आवाज ऐकून पोलीस ठाण्यातील इतर कर्मचाऱ्यांनी केबिनकडे धाव घेतली. त्यावेळी घडलेला सर्व प्रकार उघड झाला. पवार यांनी स्वतःवर रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या झाडल्या होत्या. त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, पवार यांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले यामागील नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते तणावात होते. अनेकांनी त्यांना याबाबत विचारणाही केली होती. पण त्यांनी कुणालाही काहीही सांगितले नाही. पोलिसांनी आत्महत्येमागील नेमक्या कारणांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.