ठाणे : धावत्या ट्रेनच्या टॉयलेटमध्ये मैत्रिणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. व्हॅलेंटाईन्स डेच्या पूर्वसंध्येला हा प्रकार उघडकीस आला. आरोपी तरुण आणि पीडित तरुणी गोरखपूर एक्स्प्रेसने प्रवास करत होते. यावेळी तरुणाने पीडितेला स्वच्छतागृहात नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, असा आरोप केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
धावत्या ट्रेनच्या टॉयलेटमध्ये मैत्रीणीवर बलात्कार केल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हॅलेंटाईन्स डेच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शनिवारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी तरुण आणि पीडित तरुणी दोघेही गोरखपूर एक्स्प्रेसने एकत्र प्रवास करत होते. यावेळी तरुणाने पीडितेला स्वच्छतागृहात नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, असा आोप केला जात आहे. बुधवारी सकाळी सात वाजता ही घटना घडल्याचा आरोप बलात्कार पीडितेने केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तरुणीच्या तक्रारीवरुन मुंबईतील कुरार पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर तो ठाणे रेल्वे पोलिसात वर्ग करण्यात आला. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पीडित तरुण दगड फोडणाऱ्या कंपनीत काम करत असताना तिची ओळख गिरीश नावाच्या बस चालकासोबत झाली. त्याने तिच्यावर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केले. गिरीशने तिचा नंबर अभी नावाच्या आरोपीला दिला. अभीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिचे फोटो, व्हिडीओ काढले आणि ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या मित्रांनीही पीडितेवर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.